संगीतसरताज किशोरीताई

किशोरी आमोणकर किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी मुंबई येथे झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रमुख गायिका म्हणून आजही ओळखल्या जातात त्यानं आदराने गानसरस्वती म्हणून संबोधिले जाते. त्यांना सुरवातीपासूनच संगीताची गायन परंपरा आपल्या आईकडून मिळाली. त्याचप्रमाणे संगीताच्या इतर घराण्यांकडून त्यांना विशेष संगीताचे धडे मिळाले. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये पूर्ण केले. कालांतराने त्यांचा विवाह एका प्राध्यापकांशी झाला. परंतु लवकरच त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी संगीताचा ध्यास सोडला नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली. किशोरी आमोणकरांनी १९५०च्या दरम्यान आपल्या संगीत व्यावसायिक कारकीर्दीस सुरवात केली . त्यांनी पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' या गीतासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यानंतर १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरी आमोणकर या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्...