Posts

Showing posts from August, 2018

कॉलेजचे दिवस भाग ३

Image
पत्रकारितेची  दोन वर्षे अन बरच काही ...  बी ए च शेवटच वर्षे पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. परंतु पुढे काय ? या विचारात होतो. हॉटेलचा जॉबही सोडला होता, त्यामुळे तिथे परत जाण चुकीच वाटतं होत.. काही दिवसांनी हॉटेलमधील सरांचा फोन आला.. मला तातडीने बोलवलं होत... कुणी सर आले होते हॉटेलला त्यांना भेटायला... कुठेतरी जॉब असेल या हेतुने मी लागलीच ञ्यंबकला गेलो.. ते सर म्हणजे औरंगाबाद विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत खिल्लारे होते... त्यांनी मला जॉब ऐवजी एमए मास मिडिया बद्दल सांगितले... मला तर मास मिडिया काय आहे हे माहीतही नव्हते. काय कराव म्हणून विचार केला... तर नाटकाची सुरवात तर माझी झाली होती मग म्हटलं केटी ला अ‍ॅडमिशन घेतल तर नाटकही करता येईल अन शिक्षणही म्हणून के.टी.एच.एम ला अ‍ॅडमिशन घ्यायच ठरल...अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर सुरवातीचे दिवस आम्ही दोघे तिघेच लेक्चरला असायचो... हळू-हळु बाकीची पलटण यायला सुरुवात झाली. यात अमोल, विजय, कमलेश, वैभव, विकास, अभिजित, निलेश, अझहर, यशवंत ही सगळी मंडळी होती.. यात बाकीचे असे होते की यार हे आतापर्यंत काय करत होते.. यांनी...