ए मेरे वतन लोगो ,,,,,,व्यर्थ न हॊ कुर्बानी
ए मेरे वतन लोगो ,,,,,, ए मेरे वतन के लोगो .. जरा याद करो कुर्बानी असे म्हणणाऱ्या माझ्या प्रत्येक भारतीय नागरिक सध्या तरी सुखा-समाधानाने जगत आहे . किंवा जगला पाहिजे या हेतूने रात्रीचा दिवस करून अहोरात्र देशाच्या सीमेवर लढणारे, माझ्या भारतीय बांधवांवर शत्रूने झाडलेली गोळी किंवा केलेला आघात आम्ही झेलण्यास तत्पर राहू आणि माझ्या देशावर हल्ला करणाऱ्यांचे हात मुळापासून छाटू , शत्रूला नामोहरम करण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही या उद्देशाने राष्ट्रभक्तीने झपाटलेले वीर सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतात. आपण काय करतो ? परिस्थितीचा विचार न करता आपण फक्त काहीतरी मनाच्या वरून प्रतिक्रिया देत असतो. आम्ही *'हम सब भारतीय' है*चा नारा मोठ्या गर्वाने देतो. पण खरंच आजची परिस्थिती पाहता कोणालाच काही सोयरसुतक नाही. घटना झाल्यानंतर राज्य सरकारकडून शहिदांच्या घरच्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत. फक्त १५ लाख का ? ज्या देशात खेळाडूंवर लाखो-कोटी रुपये उधळले जातात, ज्या देशातील बड्या मंदिरांमध्ये रोज लाखोंचा संपत्ती जमा होते , ज्या देशातील राजकारणी , अभिनेते , उद्योजक, क्र...