Posts

Showing posts from July, 2018

कॉलेजचे दिवस भाग -२

Image
नाटकाची सुरवात अन शेवटही ? BA पहील वर्षे नुकतेच पास झालो होतो. दुसर्‍या वर्षीच्या ऍडमिशन ची तयारी चालू होती. पहिल्या वर्षी अपडाउन केल होत. परंतु बस सोय नसल्याने पुढच्या गावापर्यंत पायी याव लागायच. मग माझा मित्र सचिन अंबापुरे हा त्र्यंबकमधील एका प्रशस्त हॉटेल मध्ये कामाला होता.  त्यामुळे  घरच्यांना हातभार लागावा तसेच मलाही खर्चायला पैसे मिळतील म्हणून  मी तिथे जॉईन झालो. आम्ही दोघे एकाच वर्गात असल्याने सकाळी 1 पर्यंत कॉलेज करायचो. मग 3 ते 11 जॉब करायचो. अशातच नाशिकच्या के.टी.एच.एम कॉलेज मध्ये युवा स्पंदनला सुरवात झाली होती. . त्यावेळी मला नाटकाचा न सुद्धा माहित नव्हता.. म्हणजे डीएड असताना सहभाग घेतला होता, पण थोडक्यात...त्रंबक कॉलेजमध्ये पवार सर (विनायक पवार सर) नाटकाच्या प्रॅक्टिस घ्यायचे. मी त्यावेळी फक्त गाणं म्हणायचो. पवार सरांनी मला विचारलं कि नाटकात काम करशील का?  मी म्हटलं बघु प्रयत्न करुन....  मग काय तालमीला सुरवात झाली.  मला पहिल्याच नाटकात लीड रोल मिळाला.. युवास्पंदन ची प्राथमिक फेरी कॉलेज मध्ये होती.. आम्ही नवीन असल्...

कॉलेजचे दिवस भाग - १

Image
                                    डेजची धम्माल अन बरच काही   2014 ला मी BA च्या शेवटच्या वर्षाला होतो. SY ला पहिला आल्यानंतर माझी वर्णी महाविद्यालयात GS म्हणून लागली. त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमात मी व माझे सहकारी सहभागी असायचे. असच एकदा कॉलेज डेजच्या निमित्ताने प्लान करायच ठरवलं. सर्व नियोजन व्यवस्थित पार पडलं. पण शेवटचा कॉलेज डे धडाक्यात साजरा करायचा. अशाप्रकारे चार पाच मित्र जमलो ... उद्याचं नियोजन सुरू होत..... राहुल, उद्या काय करायचं यार... असं मित्राला विचारलं  काहीच सुचत नव्हतं ...  गेल्या  पाच-सहा दिवसापासून महाविद्यालयात होत असलेल्या वेगवेगळ्या डेजनी मुलांचा उत्साह एकदम ओसंडून वाहत होता. मग आमचा विचार झाल्यावर मी सरांना जाऊन भेटलो.  या सर्व गोष्टींसाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते.  त्यांनी सांगितले यापूर्वी  शेवटच्या दिवशी Dj असायचा परंतु यावर्षी मॅडमने सक्त ताकीद दिली आहे कि कोणत्याही परिस्थितीत DJ वाजवायचा नाही.  अन् तसही आम्ही...