कॉलेजचे दिवस भाग -२
नाटकाची सुरवात अन शेवटही ?
BA पहील वर्षे नुकतेच पास झालो होतो. दुसर्या वर्षीच्या ऍडमिशन ची तयारी चालू होती. पहिल्या वर्षी अपडाउन केल होत. परंतु बस सोय नसल्याने पुढच्या गावापर्यंत पायी याव लागायच. मग माझा मित्र सचिन अंबापुरे हा त्र्यंबकमधील एका प्रशस्त हॉटेल मध्ये कामाला होता. त्यामुळे घरच्यांना हातभार लागावा तसेच मलाही खर्चायला पैसे मिळतील म्हणून मी तिथे जॉईन झालो.
आम्ही दोघे एकाच वर्गात असल्याने सकाळी 1 पर्यंत कॉलेज करायचो. मग 3 ते 11 जॉब करायचो. अशातच नाशिकच्या के.टी.एच.एम कॉलेज मध्ये युवा स्पंदनला सुरवात झाली होती. . त्यावेळी मला नाटकाचा न सुद्धा माहित नव्हता.. म्हणजे डीएड असताना सहभाग घेतला होता, पण थोडक्यात...त्रंबक कॉलेजमध्ये पवार सर (विनायक पवार सर) नाटकाच्या प्रॅक्टिस घ्यायचे. मी त्यावेळी फक्त गाणं म्हणायचो. पवार सरांनी मला विचारलं कि नाटकात काम करशील का? मी म्हटलं बघु प्रयत्न करुन....
मग काय तालमीला सुरवात झाली. मला पहिल्याच नाटकात लीड रोल मिळाला.. युवास्पंदन ची प्राथमिक फेरी कॉलेज मध्ये होती.. आम्ही नवीन असल्याने उत्साहात एकांकिका सादर केली. आम्ही चांगला परफॉर्मन्स करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. के.टी.एच.एम ला फायनल होती. आमची जोरात तयारी चालु होती.. एकांकिका ग्रामीण भागावर आधारित असल्याने मी बर्यापैकी करत होता. या एकांकिकेत मी गण्या नावाच करेक्टर करत होतो. आम्ही सर्वजण केटी ला जाऊन नाटकाची तयारी केली. काही वेळानंतर आमचा नं. आला होता.
सुरवातीच्या 15-20 मिनिटात आम्ही सेट लावुन दिला. आम्ही सगळे नवखे असल्याने हुरळून गेलो होतो. नाटकाला सुरवात झाली. सुरवातीला आम्ही तिघे मिञ पोहायला वैगरे जातो.... असे सिन्स होत गेले... कुठे टाळ्या मिळत होत्या कुठ प्रेक्षक हसायचे... मध्येच एकदा घाईगडबडीत सेट पडला... अस सगळ होत गेल..... असं करता करता एकांकिका सादर झाली. शेवटचा सिन आठवतोय. माझी death होतेय. सुनील नावाचा मित्र होता , त्याला पुढील संवाद होता O my god, he is dead त्यानं तो संवाद असा म्हटला O my God She is dead ... त्यामुळे पूर्ण सभागृह हसत होत. पण त्यावेळी आम्हाला काही कळलं नसल्याने आम्ही एकांकिका पार पडली. आमच्या साठी हा पहिलाच अनुभव होता. बाहेर आल्यावर अनेक जण भेटत होते. माझ्या गण्या या भूमिकेबद्दल बोलत होते.... खुप बर वाटल त्यावेळी... आजही काही शिक्षकवर्ग भेटला तर गण्या म्हणून हाक मारतात....
यानंतर आम्ही काही दिवसांनंतर पुणे येथे इंद्रधनुष्य या महोत्सवात सहभागी झालो. नंतर मग नाटकाचे वेडच लागलं होत.. यातुन मग कविता, लघुनाट्य लिहत गेलो. कधी एकांकिका, कधी पथनाट्य नंतर गावातही कार्यक्रम असले तर नाटक बसवायला लागलो.. कालांतराने के.टी.एच.एम ला अॅडमिशन घेतले... त्यामुळे काही कारणास्तव नाटक हातातुन निसटत गेले, पण नाटक सोडले नाही.... क्रमशः
Comments
Post a Comment