Posts

Showing posts from July, 2020

शाळेतल आंदोलन

Image
#गुरुपौर्णिमा_निमित्त माध्यमिक आश्रम शाळा रोहिले.  शाळेतल आंदोलन ही २००७ ची गोष्ट आहे. मी नुकताच नववी पास झालो होतो. दहावीचे वर्षे असल्यामुळे शिक्षकांनी मला त्यावर्षी होस्टेलला ठेवले.. नववीपर्यंत अपडाउन करत असल्याने.. तास सुरु झाले होते... दहावीमुळे अभ्यासही सुरू केला होता... एके दिवशी परिपाठ झाल्यानंतर आम्ही सर्व वर्गात गेलो.. सकाळचा नेहमीच गणिताचा तास असायचा... तेवढ्यात अहिरे सर वर्गावर आले.. आणि त्यांनी सांगितले की मी आजपासून तुमचं गणित घेणार आहे... सगळ्यांच्या चेहर् ‍ यावर एकच प्रश्न पडला होता... की  #पाटिल  सर काय शिकवणार म... कारण इयत्ता सहावी त्यांनी आम्हाला गणित शिकवले होते... अन् अचानक हे काय.... तेवढ्यात अहिरे सरांनी आमच्या प्रश्नाच उत्तर दिले... की पाटिल सरांची बदली झाली असुन ते आता दुसर् ‍ या शाळेवर जाणार आहेत.... आम्ही तर काहीच बोलत नव्हतो.... कसतरी तो तास झाला... पण कुणाचच मन लागत नव्हतं.... दुपारची बेल झाली अन् सगळे जेवणाच सोडुन एकमेकांना विचारायला लागल.... 'आपण सरांची बदली थांबवु' पण कशी? लागलीच आम्ही सर्व मुख्याध्यापकांकडे गेलो... त्यांना या...