शाळेतल आंदोलन


#गुरुपौर्णिमा_निमित्त




माध्यमिक आश्रम शाळा रोहिले. 
शाळेतल आंदोलन
ही २००७ ची गोष्ट आहे. मी नुकताच नववी पास झालो होतो. दहावीचे वर्षे असल्यामुळे शिक्षकांनी मला त्यावर्षी होस्टेलला ठेवले.. नववीपर्यंत अपडाउन करत असल्याने.. तास सुरु झाले होते... दहावीमुळे अभ्यासही सुरू केला होता...

एके दिवशी परिपाठ झाल्यानंतर आम्ही सर्व वर्गात गेलो.. सकाळचा नेहमीच गणिताचा तास असायचा... तेवढ्यात अहिरे सर वर्गावर आले.. आणि त्यांनी सांगितले की मी आजपासून तुमचं गणित घेणार आहे... सगळ्यांच्या चेहर्यावर एकच प्रश्न पडला होता... की #पाटिल सर काय शिकवणार म... कारण इयत्ता सहावी त्यांनी आम्हाला गणित शिकवले होते... अन् अचानक हे काय....

तेवढ्यात अहिरे सरांनी आमच्या प्रश्नाच उत्तर दिले... की पाटिल सरांची बदली झाली असुन ते आता दुसर्या शाळेवर जाणार आहेत.... आम्ही तर काहीच बोलत नव्हतो.... कसतरी तो तास झाला... पण कुणाचच मन लागत नव्हतं.... दुपारची बेल झाली अन् सगळे जेवणाच सोडुन एकमेकांना विचारायला लागल.... 'आपण सरांची बदली थांबवु' पण कशी? लागलीच आम्ही सर्व मुख्याध्यापकांकडे गेलो... त्यांना याबाबत सांगितले.. परंतु त्यांनीही आता काही होणार नाही, असे सांगितले...

आम्ही राञी मुल मुल जमलो.. आणि एक प्लान केला... सकाळी ७ वाजता शाळेत व्हायच.. ते ही गणवेशात.
सकाळी सगळेजण गणवेशात शाळेत जमलो... गणवेश- हाफ सफेद शर्ट. खाकी हाफ पॅन्ट, अन् डोक्यात गांधी टोपी.. असा गणवेश होता...
सर्वजण निघालो... तेही पायी.. रोहिले आश्रमशाळा ते आदिवासी विकास भवन येथे...देवरगाव सोडल्यानंतर कश्यपी धरणावरुन खाड्याची वाडी हे गाव सोडले होते.....तितक्याच आमचा आम्हाला थांबवून सांगितले.. की सर्व शिक्षकवृंद आपल्या पाठीमागे आले असून आपण थांबायच नाही... एक किलोमीटरच्या अंतरावर गेलो असता सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी आम्हाला थांबवले....

आम्ही त्याच ठिकाणी बसून घेतले.... सकाळपासून काही खाल्ल नसल्याने आम्हाला भुकाही लागल्या होत्या... शिक्षक समजुत घालत होते... परंतु आम्हीही ऐकत नव्हतो... शेवटी तासाभराने आदिवासी विकास भवनचे अधिकारी आणि पाटिल सर आले... आम्हाला वाटलं आता सरांची बदली होणार नाही....पण तस काही झालं नाही...... आमची निराशा झाली... पाटिल सरांनी खुप समजुन सांगितले आणि मग आम्ही शाळेत आलो........

#गुरुआणिशिष्यएकभावनाआहे.....
#बाकी_परिस्थिती_खुप_काही_शिकवत_असते......

Comments

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य