संगीत वाद्य
भारतीय संगीतातील वाद्ये संगीत या शब्दात गायनाबरोबरच वादनकला अभिप्रेत आहे . संगीताची व्याख्या करताना प्राचीन संगीतकारांनी "गीतम वाद्यम तथा नृत्यम " अशी केली आहे. गायन क्रियॆइतकीच वादन क्रिया पण प्राचीन काळापासून संगीत क्षेत्रात प्रभावी ठरत आहे. कंठसंगीताचा उगमकाळ जितका प्राचीन आहे, तितकाच वाद्यासंगीताचा उगमकाळ पण प्राचीन आहे. आदिमानवाकालीन जगतात उपलब्ध हत्यारे हि वाद्यसंगीताचे उगमस्थान होत. आपल्या हर्शादी भावना व्यक्त करण्यासाठी हातावर हात आपटणे (टाळ्या वाजवणे ) , मांड्या बडवणे इत्यादी प्रकार मानवाने अवलंबिले. नंतर शिकारीच्या निमित्ताने विविध दगडी हत्यारे तो बनवू लागला . मग ती हत्यारे आपटून आवाज काढू लागला व त्यातून घन्वाद्ये जन्म पावली . धनुष्याची कल्पना माणसास सुचली व त्याच्या तारेतून तंतुवाद्याचा जन्म झाला . शिकार करून आणलेल्या प्राण्याच्या कातडीतून चर्मवाद्ये विकसित झाली . एखाद्या पोकळीतून हवा जाताना आवाज निघतो याची प्रचीती निसर्गात येताच त्यातून सुषीर (हवेच्या सहाय्याने वाजवणारी ) वाद्ये जन्म पावली . याचा अर्थ एकच कि अगदी प्राचीन काळापासून माणसाने निसर्गाच्या सानिध्या...