आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..!

आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..! आज सकाळी मित्राचा कॉल आला, अरे मला खूपच भारी झालंय, लवकर ये...दोन तीन दिवसापासून आजारी असल्याने त्याला उठताही येत नव्हते. मग लागलीच त्याच्या घरी गेलो. झोपलेलाच होता, म्हटला, निघायचं का? आधी थोडस खाऊन घे, लगेच निगु...! गाडीला किक मारली अन निघालो...! पाच दहा मिनिटात दवाखान्यात पोहचलो. साडे दहाची वेळ असल्याने अद्याप कुणी पेशंट नव्हतं, त्यामुळं याला लगेचच इंजेक्शन आणि सलाईन लावलं. आमच्यानंतर एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन आत आली. ते मुलं अधून मधून खोकत होतं. त्याला डॉक्टरांनी तपासून वाफ देण्यास सांगितली. सिस्टरने लागलीच त्याला वाफ देत डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे गोळ्या औषधें दिली. बिल झालं होतं दोनशे रुपये ... त्या महिलेने विनवणी करीत डॉक्टरांना पैशासाठी थांबायला सांगितलं..त्या लहान बाळाला चार दिवसांचा कोर्स होता. आजचा तिसरा दिवस होता. त्याच्या आईच्या बोलण्यावरून त्याच्यात फरकही पडला होता. परंतु आजही त्या महिलेकडे देण्यास पैसे नव्हते. गहिवरून आलं. डॉक्टरांनी सांगितलं, एकवेळ तुमच्या पोटाला मारा पण लहान पोरांकड लक्ष देत चला, तुमच्याकड पैसे आले...