Posts

Showing posts from February, 2016

भारतीय शास्त्रीय संगीत प्रकार

Image
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीतातील दोन प्रकारातील एक प्रकार आहे. ११व्या आणि १२ व्या शतकात मुस्लिम मोठ्या प्रमाणावर भारतीय संगीताला प्रसिद्धी मिळवून दिली.त्यामुळे भारतीय संगीताला योग्य दिशा मिळाली. ही दिशा प्रा.ललित किशोर सिंह च्या मतानुसार युनाणी पायथागोरस च्या ग्राम व अरबी , फारशी ग्राम च्या अनुरूप आधुनिक बिलावल थाट ची रचना मानली जाते. याआधी अनेक थाटांचा शुद्ध स्वरुपात उपयोग होतो. परंतु शुद्ध स्वरांच्या अतिरिक्त उत्तर भारतीय संगीतामध्ये अरबी आणि फारशी किंवा इतर विदेशी संगीतावर दूसरा प्रभाव पडला नाही. मध्ययुगीन काळात मुसलमान गायकांनी आणि नायकांनी भारतीय संगीतावरील संस्कार अबाधित ठेवले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हे केवळ उत्तर भारतातच नाही तर बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशात देखील मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कर्नाटक संगीत : कर्नाटक संगीतला संस्कृत मध्ये कर्नाटक सड्गीत भारताच्या शास्त्रीय संगीताच्या दक्षिण भारताच्या एका शैलीचे नाव आहे . जी उत्तर भारताची संगीत शैली हिंदुस्तानी संगीत पेक्षा वेगळी आहे. कर्नाटक स...

भारतीय शास्त्रीय संगीत

Image
भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान  भरतमुनींनी रचलेल्या नाट्यशास्त्राला भारतीय संगीताच्या इतिहासात प्रथम लिखित साधन मानले जाते. या रचने संदर्भात अनेक मतभेद आढळून येतात. आजच्या भारतीय संगीतातील विविध पैलूंचा उल्लेख या ग्रंथात आढळून येतो. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानंतर मतग्ड मुनींची बृहद्देशी आणि शारंगदेव रचित संगीत रत्नाकर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते.बाराव्या शतकाच्या पूर्वर्धात लिहलेल्या सात अध्याय असलेल्या ग्रंथामध्ये संगीताचे व नृत्याचे सखोलपणे वर्णन केलेले दिसून येते.भारतीय शास्त्रीय संगीत हे भारतीय संगीताचे विभिन्न अंग आहे. शास्त्रीय संगीताला आपण क्लासिकल म्यूजिक देखील म्हटले जाते. शास्त्रीय गायन हे ध्वनि प्रधान असते ,शब्द प्रधान नाही.यामध्ये ध्वनीला महत्व असते. ज्याकडे उत्तम श्रवणाची कला असते, त्याला शास्त्रीय संगीत चांगल्या प्रकारे समजत असते. श्रवणीय कान शब्दांच्या अर्थाबरोबर चित्रपट संगीत,तसेच लोकसंगीताचा आस्वाद घेत असतात. यामुळे अनेक लोकांच्या मनात स्वाभाविकच संगीता बद्दल गोडी निर्माण होते. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा भरतमुनींच्या आणि त्यापूर्वी सामवेदात दिस...

राग

Image
राग दर्पण   राग हा संगीताचा आत्मा म्हणून ओळखला जातो. संगीत या   कलेचा मूल आधार आहे. राग या शब्दाचा उल्लेख हा  भरत मुंनीच्या नाट्यशास्त्रात देखील आढळला जातो. रागाचे सृजन  बावीस श्रुतींच्या विविध प्रकारातून प्रयोग करून , त्याचा विविध रस अथवा भाव यांना दर्शवण्यासाठी केला जातो. प्राचीन काळात रागामध्ये पुरुष व स्त्री रागात म्हणजेच राग व रागिनी मध्ये विभाजन केले जाते. तसेच काही रागांना  मुलाचा राग म्हणून ओळखले जाते. उदा. राग भैरवला पुरुष राग आणि आणि भैरवी , बिलावली बरोबर अन्य रागांना त्यांची रागिनी तथा राग ललित बिलावल या सारख्या रागांना मुलाचे स्थान देण्यात आलेले आहे. पुढे जाऊन पं.विष्णु नारायण भातखंडे यांनी सर्व रागांना दहा थाटात विभाजन केले आहे. म्हणजेच एका रागातून अनेक रागांची निर्मिती होते. म्हणजेच एका थाटाला झाडाच्या रूपात पाहिले तर उपराग जे असतील ते फांद्याच्या स्वरुपात असतील असे गृहीत धरता येते. उदा. राग शंकरा , राग दुर्गा , राग अल्हेय्या बिलावल या सारख्या रागांची थाट बिलावल या रागातून निर्मिती होते. थाट या रागात सर्व स्वर शुद्ध मानले जातात ....