राग
राग दर्पण
राग हा संगीताचा आत्मा म्हणून ओळखला जातो. संगीत या
कलेचामूल आधार आहे. राग या शब्दाचा उल्लेख हा
भरतमुंनीच्यानाट्यशास्त्रात
देखील आढळला जातो.रागाचे सृजन
बावीस श्रुतींच्या विविध प्रकारातून प्रयोग करून, त्याचा विविध रस अथवा भाव यांना दर्शवण्यासाठी केला जातो. प्राचीन काळात रागामध्ये पुरुष व स्त्री रागात म्हणजेच राग व रागिनी मध्ये विभाजन केले जाते. तसेच काही रागांना मुलाचा राग म्हणून ओळखले जाते. उदा. राग भैरवला पुरुष राग आणि आणि भैरवी,बिलावली बरोबर अन्य रागांना त्यांची रागिनी तथा राग ललित बिलावल या सारख्या रागांना मुलाचे स्थान देण्यात आलेले आहे. पुढे जाऊन पं.विष्णु नारायण भातखंडे यांनी सर्व रागांना दहा थाटात विभाजन केले आहे. म्हणजेच एका रागातून अनेक रागांची निर्मिती होते. म्हणजेच एका थाटाला झाडाच्या रूपात पाहिले तर उपराग जे असतील ते फांद्याच्या स्वरुपात असतील असे गृहीत धरता येते. उदा. राग शंकरा,राग दुर्गा, राग अल्हेय्या बिलावल या सारख्या रागांची थाट बिलावल या रागातून निर्मिती होते. थाट या रागात सर्व स्वर शुद्ध मानले जातात . या थाटातून निर्माण झालेले उपराग यांचे देखील स्वर शुद्ध मानले जातात. परंतु या दहा थाटांचा सिद्धांत जर बघितला तर काही राग कोणत्याच थाटामध्ये सामाविष्ट होताना दिसत नाही. परंतु त्यांना नियमांच्या अधीन राहू कोणत्या ना कोणत्या रागात सामाविष्ट केले जाते.
1)औडव
जाती : या रागामध्ये विशेष पाच स्वरांचा उपयोग कीला जातो .
2)षाडव
जाती : या रागामध्ये सहा स्वरांचा उपयोग केला जातो.
3)संपूर्ण
जाती : या रागामध्ये संपूर्णत: सात स्वरांचा उपयोग केला जातो.
रागाच्या
स्वरूपाला आरोह व अवरोह गाऊन प्रदर्शित केले जाते. ज्यामध्ये राग विशेष मध्ये
येणार्या स्वरांना क्रमानुसार गायले जाते. उदा.राग भुपालीचा आरोह
पुढीलप्रमाणे: सा , रे , ग , प , ध ,सा कोणत्याही रागात दोन
स्वरांना विशेष महत्व दिले जाते .यांना वादी स्वर व संवादी स्वर म्हणून ओळखले
जाते. वादी स्वरांना रागाचा राजा म्हटले जाते. कारण या रागात या स्वराचा बहुतेक
वेळा उपयोग केला जातो. दूसरा महत्वाचा स्वर म्हणजे संवादी स्वर ज्याचा उपयोग वादी
स्वरापेक्षा कमी परंतु अन्य स्वरापेक्षा अधिक केला जातो . या प्रमाणे कोणत्याही
दोन रागात ज्यामध्ये दोन समान स्वरांचा उपयोग होतो . वादी व संवादी स्वर वेगळे
केल्यानंतर रागाचे स्वरूप बदलत जाते . उदा. राग भूपाली व देशकार मध्ये सर्व स्वर
समान आहेत परंतु वादी व संवादी स्वर वेगळे झाल्यामुळे या रागातील फरक लक्षात येतो
. प्रत्येक रागात एक विशेष स्वर समूह सारखा-सारखा उपयोगात आणल्यास त्या
रागाची वेगळी ओळख निर्माण होते. ज्याप्रमाणे राग हमिर मध्ये ‘ग म ध’ च सारखा-सारखा प्रयोग केला
जातो. आणि ही स्वर समूह हमिर ची ओळख आहे.
पवार
गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम
कॉलेज
पत्रकारिता
व जनसंज्ञापन विभाग
Comments
Post a Comment