भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान

भरतमुनींनी रचलेल्या नाट्यशास्त्राला भारतीय संगीताच्या इतिहासात प्रथम लिखित साधन मानले जाते. या रचने संदर्भात अनेक मतभेद आढळून येतात. आजच्या भारतीय संगीतातील विविध पैलूंचा उल्लेख या ग्रंथात आढळून येतो. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानंतर मतग्ड मुनींची बृहद्देशी आणि शारंगदेव रचित संगीत रत्नाकर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते.बाराव्या शतकाच्या पूर्वर्धात लिहलेल्या सात अध्याय असलेल्या ग्रंथामध्ये संगीताचे व नृत्याचे सखोलपणे वर्णन केलेले दिसून येते.भारतीय शास्त्रीय संगीत हे भारतीय संगीताचे विभिन्न अंग आहे. शास्त्रीय संगीताला आपण क्लासिकल म्यूजिक देखील म्हटले जाते. शास्त्रीय गायन हे ध्वनि प्रधान असते ,शब्द प्रधान नाही.यामध्ये ध्वनीला महत्व असते. ज्याकडे उत्तम श्रवणाची कला असते, त्याला शास्त्रीय संगीत चांगल्या प्रकारे समजत असते. श्रवणीय कान शब्दांच्या अर्थाबरोबर चित्रपट संगीत,तसेच लोकसंगीताचा आस्वाद घेत असतात. यामुळे अनेक लोकांच्या मनात स्वाभाविकच संगीता बद्दल गोडी निर्माण होते. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा भरतमुनींच्या आणि त्यापूर्वी सामवेदात दिसून येते.

संगीत रत्नाकर मध्ये अनेक तालांचा उल्लेख आढळतो . या ग्रंथाच्या अभ्यासानुसार लक्षात येते की , प्राचीन भारतीय संगीतात अनेक बदल व्हायला सुरवात झाली. संगीत सुरवातीपासून उदार होते ,पण त्याचे मुळतत्व एकच होते. अकराव्या आणि बाराव्या शतकात मुस्लिम शासकानी संगीताचा प्रसार केल्याने उत्तर भारतीय संगीताला एक नवी दिशा मिळाली . राजदरबार संगीताचे प्रमुख संरक्षक झाले. त्याचकाळात अनेक शासकांनी प्राचीन भारतीय संगीताच्या समृद्ध परंपरेला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे संगीताची आवश्यकता आणि आवड यानुसार त्यामध्ये अनेक बदल घडून आले. याच काळात अनेक नवीन पद्धती निर्मिल्या गेल्या. उदा. ख्याल,गझल यासारख्या आणि भारतीय संगीतातील अनेक नवीन वाद्यांचा परिचय झाला. उदा.सरोज, सितार इत्यादी.

भारतीय संगीताची आधुनिक मनीषा प्रस्थापित झालेली दिसून येते. वैदिक काळात सुरू झालेली भारतीय संगीतातील वाद्यांची यात्रा एकानंतर एक अशी विशेषता या वादयामध्ये विकसित होत गेली. एक तंतरी वीणा पुढे तितंत्री झाली. आणि यामध्ये विशेष बदल होऊन मध्ययुगीन कालखंडात ती किंनरी वीणा नावाने प्रसिद्ध झाली. भारतात आलेले मुस्लिम संगीतकार तीन तार विणेला सहतार किंवा सितार म्हणू लागले. याचप्रमाणे सप्ततंतरी किंवा चित्रा वीणा पुढे जाऊन सरोद नावाने ओळखली जाऊ लागली. उत्तर भारतात मुघल राज्य पसरले होते. त्यामुळे उत्तर भारतीय संगीतावर मुस्लिम संस्कृतीचा व मुस्लिम धर्माचा प्रभाव दिसून येतो. याउलट दक्षिण भारतामध्ये असलेले संगीत काही प्रमाणात मुस्लिम शासकांपासून दूर राहिले. त्यानंतर सूफी या प्रकाराने भारतीय संगीतावर विशेष प्रभाव पाडला. पुढे जाऊन अनेक भागात नवीन पद्धती व घराणेशाहीचा जन्म झाला. ब्रिटिश शासन काळात अनेक नवीन वाद्ये प्रचलित झाली .सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय असलेले वाद्य म्हणून हार्मोनियम त्याच काळात प्रचलित झाले. अशाप्रकारे भारतीय शास्त्रीय संगीताला घडवण्यासाठी प्रत्येक कालखंडाचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम महाविद्यालय
Comments
Post a Comment