हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
हे भारतीय शास्त्रीय संगीतातील दोन प्रकारातील एक प्रकार आहे. ११व्या आणि १२ व्या
शतकात मुस्लिम मोठ्या प्रमाणावर भारतीय संगीताला प्रसिद्धी मिळवून दिली.त्यामुळे
भारतीय संगीताला योग्य दिशा मिळाली. ही दिशा प्रा.ललित किशोर सिंह च्या मतानुसार
युनाणी पायथागोरस च्या ग्राम व अरबी ,फारशी ग्राम च्या अनुरूप आधुनिक बिलावल थाट ची रचना मानली
जाते. याआधी अनेक थाटांचा शुद्ध स्वरुपात उपयोग होतो. परंतु शुद्ध स्वरांच्या
अतिरिक्त उत्तर भारतीय संगीतामध्ये अरबी आणि फारशी किंवा इतर विदेशी संगीतावर
दूसरा प्रभाव पडला नाही. मध्ययुगीन काळात मुसलमान गायकांनी आणि नायकांनी भारतीय
संगीतावरील संस्कार अबाधित ठेवले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हे केवळ उत्तर
भारतातच नाही तर बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशात देखील मोठ्या प्रमाणावर
प्रचलित आहे.
कर्नाटक संगीत :
कर्नाटक संगीतला संस्कृत
मध्ये कर्नाटक सड्गीत भारताच्या शास्त्रीय संगीताच्या दक्षिण भारताच्या एका शैलीचे
नाव आहे. जी उत्तर भारताची संगीत शैली हिंदुस्तानी संगीत पेक्षा
वेगळी आहे. कर्नाटक संगीतात जास्तीत जास्त भक्ति संगीताच्या रचनेत केला जातो. आणि
जास्तीत जास्त रचना ह्या हिंदू देवी , देवतांना अनुसरून असतात . या व्यतिरिक्त काही भाग हा प्रेम
आणि सामाजिक मुद्यावर आधारलेला असतो . जसे की, साधारणपणे भारतीय
संगीतात असते . कर्नाटक संगीतात देखील राग आणि ताल या दोन मुख्य तत्वावर आधारलेले
आहे. कर्नाटक शास्त्रीय शैलीत रागांचे गायन अधिक वेगाने परंतु हिंदुस्तानी
शैलीच्या तुलनेत कमी वेळेचे असते . त्यागराज ,मुथुस्वामी , आणि श्यामा शास्त्री
यांना कर्नाटक संगीत शैलीची त्रिमूर्ति म्हटले जाते. पुरंदर दास यांना कर्नाटक
शैलीचे पितामह म्हणून ओळखले जाते. कर्नाटक शैली च्या विषयांत पुजा-पाठ , मंदिराचे वर्णन , नट-नटी वर्णन आणि देशभक्ती
विषयी संगितले जाते.
कर्नाटक गायन शैलीच्या प्रमुख
रचना :
वर्णम : वर्णम या रचनेचे तीन मुख्य भाग पल्लवी , अनुपल्लवी , मुक्तीश्वर .
प्रत्यक्षात यांची तुलना हिंदुस्तानी संगीतातील ठुमरी या गायन प्रकाराशी केली
जाते.
जावाली : ही प्रेम प्रधान गीतांची शैली आहे. भरतनाट्यम सोबत या
शैलीला विशेष रचनेत गायले जाते. या शैलीची गायनाची गती अधिक वेगाने असते.
तिल्लाना : उत्तर भारतीय संगीतात ज्याप्रमाणे तराना ही संगीत रचना
असते , त्यासारखी ही शैली असते. ही भक्ति प्रधान गायन शैली आहे .
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम महाविद्यालय
Comments
Post a Comment