संगीतशैलीची परंपरा जतन करणारी कुटुंबे
भारतीय संगीतातील घराणी आपल्या भारतीय संगीतात पूर्वी संगीत शिक्षण गुरुकुल पद्धतीने होत असे. एखाद्या श्रेष्ठ गायकाकडे संगीत शिकण्यासाठी राहणारी व्यक्ती त्या गायकाची मनोभावे सेवा करून,त्याच्या सानिध्यात चोवीस तास राहून संगीतकला अवगत करून घेत असे. पूर्वीच्या काही श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने आपल्या स्वतच्या गायकीची एक विशिष्ट शैली निर्माण केली व पुढे आपल्या शिष्याकरवी ती तशीच्या तशी जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संगीतशैलीची एक विशिष्ट कुटुंबेच संगीतक्षेत्रात वावरू लागली. त्यातून संगीतातील घराण्यांचा जन्म झाला. थोडक्यात असे म्हणता येईल की संगीतातील ही घराणी म्हणजे विविध संगीतशैलीची परंपरा जतन करणारी कुटुंबेच होय. ग्वालेर घराणे : प्रख्यात संगीतकार खॉ नथन पीरबक्ष हे या घराण्याचे संस्थापक. त्यांचे नातू प्रख्यात ख्यालगायक हस्मु खॉ व हददू खॉ हे ग्वालेर दरबारचे गायक होते. महाराष्ट्रात ख्याल गायकी आणणारे कै. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे याच घराण्याचे. संगीताचा सर्व भारतभर प्रभावी प्रचार करणारे व विद्यालयीन पद्धतीच्या संगीतशिक्षणाचा...