संगीत वाद्य
भारतीय संगीतातील वाद्ये
चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.
भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरुन गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.

बासरी: हे वेळूपासून बनलेले एक फुंकून वाजविण्याचे वाद्य. हे श्रीकृष्णाचे आवडते वाद्य होते.भारतात हे वाद्य फार पुरातन काळापासून प्रचलीत आहे. बासरीची लांबी 12" ते जवळजवळ 40" असते.बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. हे भारतीय संगीतातील वाद्यांमधील आद्य वाद्य मानले जाते. भुंग्यांनी भोक पाडलेल्या बांबू मधून वारा जाताना आलेल्या आवाजामुळे या वाद्याची कल्पना सुचल्याचे मानले जाते. सामान्यतः, बासरी ही बांबूपासून बनवली जाते. एका टोकाला बांबू कॄत्रिम बुचाने बंद केला जातो, अथवा बांबूच्या पेराच्या सांध्याचाच वापर करून ते टोक बंद राखले जाते. बासरीला हाताच्या बोटांनी बंद करून/उघडी ठेवून स्वर काढण्यासाठीची ६/७/८ छिद्रे (स्वररंध्रे) असतात, आणि एक फुंकरीचे छिद्र (मुखरंध्र) असते. मुखरंध्र हे बंद टोकाजवळ असते. त्याखाली सामान्यतः म, ग, रे, सा, नी, ध आणि प या स्वरांची स्वररंध्रे असतात. काही वेळा 'प' च्या स्वररंध्राखाली 'म' चे स्वररंध्र बनवले जाते. बासरीवादक श्री केशवराव गिंडे यांनी केलेल्या नव्या संरचनेमध्ये मुखरंध्राकडील म च्या स्वररंध्राच्या वर प चे एक स्वररंध्र बनवले जाते.
सनई हे तोंडाने फुंकून वाजवण्याचे एक वाद्य आहे. बिस्मिल्ला खाँ हे भारतातील ज्येष्ठ सनई वादक होते.
सरोद : हे हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातलं एक प्रमुख तंतुवाद्य आहे. असं समजलं जातं कि सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब ह्या वाद्यातून झाली आहे. सरोद ह्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत गाणं असा आहे. लाल मणी मिश्रा ह्यांच्या मतानुसार सरोद हा चित्र वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरशृंगार ह्या वाद्यांचं संमिश्रण आहे. मैहर घराण्याच्या सरोदला चार मुख्य तारा, चार अतिरिक्त तारा, दोन चीकारी आणि पंधरा तर्फेच्या तारा असतात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीचा "जवा" वापरला जातो. अल्लाउद्दिन खान, आली अकबर खान, हाफिज आली खान, अमजद आली खान, बुद्धदेव दासगुप्ता, राधिका मोहन मोईत्रा, शरण राणी, झरीन दारूवाला हे विसाव्या शतकातले काही प्रमुख सरोदवादक आहेत.
विणा : विणा भारतातील सर्वात लोकप्रिय असे वाद्य आहे. या वाद्याचा उपयोग शास्त्रीय संगीतात केला जातो .संगीत या विषयात वाद्य संगीतावर पण बरेच संशोधन करून त्यांचे पण एक शास्त्र बनवले आहे संगीताचा मुल आधार प्राचीन ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र . यात संगीताविषयी जे अध्याय आहेत त्यातील २८ व अध्याय वाद्यसंगीतावर असून , त्यात भारतीय दृष्टीकोनातून प्रचारात आलेल्या वाद्याचे विवेचन केलेले आहे .
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच. एम महाविद्यालय
Comments
Post a Comment