गायकी
गायकीची समृद्धता
प्राचीन काळी संगीत हे देवालयाशीच संबंधित होते . संगीताचा विकास मंदिरांच्याच वातावरणात झाला . त्यामुळे प्रबंधाची रचना संस्कृत भाषेत होणे हे सहजच होते . पुढे मात्र सर्वसामान्य माणसाची गरज लक्षात घेऊन प्रबंधाची रचना प्रादेशिक भाषामधून झाली असावी . सोळाव्या शतकात मराठी कवी दासोपंत यांनी मराठीत रचलेले प्रबंध आज मुद्रित स्वरुपात पहावयास मिळतात . प्राची काळी प्रबंधाचे गायन , प्रादेशिक वृत्तात आणि छंदात होत असावे . सध्या प्रबंध गायन पूर्णपणे लुप्त झाले असल्यामुळे केवळ अनुमाने काढणेच शक्य आहे. प्राचीन ग्रंथामधून प्रबंध गायनाचे वर्णन आढळते . "प्रबध्यते इति प्रबंध :" म्हणजे नियमानुसार केलेले बांधीव गायन म्हणजे प्रबंध होय . भारतीय संगीतात गेले १५० ते २०० वर्षात ख्याली गायकी पावून आज रागसंगीताचे गायन पूर्णपणे ख्याल गायकीने व्यापून टाकले आहे .
ख्याल : भारतात मुसलमानी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय संस्कृतीवर जे परिणाम झाले , त्यातून संगीतही सुटले नाही . धृपद गायकी सर्वत्र असताना ख्याल गायकीचा उदय होऊ लागला . साधारणपणे पंधराव्या शतकात जौनपुर येथे बादशहा सुलतान हुसेन शर्की होऊन गेला. तो अत्यंत संगीतप्रेमी होता . त्याने ख्याल गायकी प्रथम प्रचारात आणली असे मानली जाते .ख्याल हा फारशी शब्द आहे . त्याचा अर्थ कल्पना असा आहे . ख्याल गायकीत आपल्या कल्पनेप्रमाणे स्वरांचा विस्तार कौशल्यपूर्ण पद्धतीने करता येतो. म्हणूनच या गीत्प्रकारास ख्याल असे म्हणतात . धृपदासारखे लयीचे बंधन नसल्याने आपल्या बुद्धीकौश्यल्याने रागातील निरनिराळे स्वरसमूह विविधतेने नटवून रागाविष्कार करणे सहज शक्य होते. त्यामुळे ख्याल गायकी अत्यंत लोकप्रिय झाली . आजतागायत ख्यालाची लोकप्रियता कायम आहे. आज तर भारतीय संगीताची मैफल ख्यालमध्ये सामावलेली असून धृपद गायकी जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे.
ठुमरी : हा एक वैचित्र्यपूर्ण प्रकार आहे ख्यालगायकी इतकाच अत्यंत लोकप्रिय असा हा गीतप्रकार आहे. काही काळापूर्वी हि ठुमरी गायली शास्त्रीय संगीतात हलक्या प्रतीची मानली जात होती . उत्तर भारतात ठुमरी फार प्रचारात असून लखनौ , बनारस इत्यादी भागातील ठुमरी गायक अखिल भारतात प्रसिध्द आहेत य़तिल काव्य शृंगाररस प्रधान आहे. ठुमरी गायन साधारण पणे विलंबित लयीतच मोडते . जोरदार तानबाजी ठुमरी गायनाला अभिप्रेत नाही . साधारणपणे काफी , खमाज पिलू, भैरवी , तिलंग आदी राग ठुमरीसाठी प्रसिद्ध आहेत . दीपचंदी , पंजाबी , दादरा या तालात बहुतेक ठुमर्या गातात .
गझल : हा एक उर्दू भाषेतील गीतप्रकार असून , मुसलमानांनी आपल्याबरोबरच भारतात आणून तो संगीतात परसारीत केला . प्रेमिकांचे प्रेमोद्गार , सौंदर्य वर्णन , भक्तिरस इत्यादी विषयातील काव्ये म्हणजे गझल . काव्यातून भक्ती व शृंगार असा द्विअर्थि अर्थ असणारे काव्य हेही गझलचे वैशिष्ट्य ठरते . शेर गाण्याची खास पद्धत गझलमध्ये असते . आलाप, तानांचा मुक्त उपयोग शेर पद्धतीत केला जातो. धुमाळी , दीपचंदी ,रूपक इत्यादी ताल गझलसाठी वापरतात .
कव्वाली : खास करून मुसलमानी समाजात हा गीतप्रकार जास्त लोकप्रिय आहे . अर्थातच काव्य उर्दू भाषेतच असते . अस्ताई , अंतरा मध्ये गझल प्रमाणे शेर गातात . ढोलकीच्या साथसंगतीत कव्वाली या तालात किंवा धुमाळी तालात कव्वाली गातात . कव्वाली गाताना हातावर ताळी वाजवूनही ताल धरला जातो.
लावणी : हा प्रकार महाराष्टात अत्यंत लोकप्रिय असून खेडोपाडी जत्रेच्या वेळी लावण्या गाणारांचे फड पडलेले दिसतात . हा प्रकार शुध्द मराठमोळा असला तरी त्याचे आगमन उत्तरेतून महाराष्टात झाले असावे असा समज आहे. तथापि आज हा एक महाराष्ट्रातला खास गीतप्रकार आहे. शब्दाचे दोन अर्थ निघणे हे या काव्याचे खास वैशिष्ट्य. काव्य बहुधा काफी, पहाडी, पिलू , कालीगडा , भैरवी या रागात असते य़तिल गीतांना अनेक चरण असतात . त्यांना चौक म्हणतात . हा गीतप्रकार क्षुद्र संगीत म्हणून उपेक्षिला जातो . परंतु लोकनाट्या चे (तमाशाच्या ) माध्यमातून तो सर्व थरात लोकप्रिय होऊ लागला आहे . बहुतेक लावण्या केरवा तालात ढोलकीच्या जोडीने गायल्या जातात
पोवाडे : भारताच्या इतिहासातील वीर पुरुषांचे गोडवे किंवा वीर गाथाचे वर्णन ज्या काव्यात केले जाते त्यास पवाडा असे म्हणतात . अशी काव्ये रचून ती गीतकारांना किंवा गायकांना शाहीर म्हणून ओळखले जाते . डफ , किंवा तुणतुण्याच्या तालासुरात पोवाडे गायन रात्ररात्र उजडून काढत असते . समाजात राष्ट्रप्रेम,वीरवृत्ती इत्यादी भावना रुजवण्याचे काम पोवाड्याने केलेले आहे.
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम महाविद्यालय
ख्याल : भारतात मुसलमानी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर भारतीय संस्कृतीवर जे परिणाम झाले , त्यातून संगीतही सुटले नाही . धृपद गायकी सर्वत्र असताना ख्याल गायकीचा उदय होऊ लागला . साधारणपणे पंधराव्या शतकात जौनपुर येथे बादशहा सुलतान हुसेन शर्की होऊन गेला. तो अत्यंत संगीतप्रेमी होता . त्याने ख्याल गायकी प्रथम प्रचारात आणली असे मानली जाते .ख्याल हा फारशी शब्द आहे . त्याचा अर्थ कल्पना असा आहे . ख्याल गायकीत आपल्या कल्पनेप्रमाणे स्वरांचा विस्तार कौशल्यपूर्ण पद्धतीने करता येतो. म्हणूनच या गीत्प्रकारास ख्याल असे म्हणतात . धृपदासारखे लयीचे बंधन नसल्याने आपल्या बुद्धीकौश्यल्याने रागातील निरनिराळे स्वरसमूह विविधतेने नटवून रागाविष्कार करणे सहज शक्य होते. त्यामुळे ख्याल गायकी अत्यंत लोकप्रिय झाली . आजतागायत ख्यालाची लोकप्रियता कायम आहे. आज तर भारतीय संगीताची मैफल ख्यालमध्ये सामावलेली असून धृपद गायकी जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे.
गझल : हा एक उर्दू भाषेतील गीतप्रकार असून , मुसलमानांनी आपल्याबरोबरच भारतात आणून तो संगीतात परसारीत केला . प्रेमिकांचे प्रेमोद्गार , सौंदर्य वर्णन , भक्तिरस इत्यादी विषयातील काव्ये म्हणजे गझल . काव्यातून भक्ती व शृंगार असा द्विअर्थि अर्थ असणारे काव्य हेही गझलचे वैशिष्ट्य ठरते . शेर गाण्याची खास पद्धत गझलमध्ये असते . आलाप, तानांचा मुक्त उपयोग शेर पद्धतीत केला जातो. धुमाळी , दीपचंदी ,रूपक इत्यादी ताल गझलसाठी वापरतात .
कव्वाली : खास करून मुसलमानी समाजात हा गीतप्रकार जास्त लोकप्रिय आहे . अर्थातच काव्य उर्दू भाषेतच असते . अस्ताई , अंतरा मध्ये गझल प्रमाणे शेर गातात . ढोलकीच्या साथसंगतीत कव्वाली या तालात किंवा धुमाळी तालात कव्वाली गातात . कव्वाली गाताना हातावर ताळी वाजवूनही ताल धरला जातो.
लावणी : हा प्रकार महाराष्टात अत्यंत लोकप्रिय असून खेडोपाडी जत्रेच्या वेळी लावण्या गाणारांचे फड पडलेले दिसतात . हा प्रकार शुध्द मराठमोळा असला तरी त्याचे आगमन उत्तरेतून महाराष्टात झाले असावे असा समज आहे. तथापि आज हा एक महाराष्ट्रातला खास गीतप्रकार आहे. शब्दाचे दोन अर्थ निघणे हे या काव्याचे खास वैशिष्ट्य. काव्य बहुधा काफी, पहाडी, पिलू , कालीगडा , भैरवी या रागात असते य़तिल गीतांना अनेक चरण असतात . त्यांना चौक म्हणतात . हा गीतप्रकार क्षुद्र संगीत म्हणून उपेक्षिला जातो . परंतु लोकनाट्या चे (तमाशाच्या ) माध्यमातून तो सर्व थरात लोकप्रिय होऊ लागला आहे . बहुतेक लावण्या केरवा तालात ढोलकीच्या जोडीने गायल्या जातात
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम महाविद्यालय
Comments
Post a Comment