पं . विष्णू नारायण भातखंडे

पं . विष्णू नारायण भातखंडे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात इंग्रजीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता . त्यावेळी सुद्धा गुरूला विशेष महत्व होते. इतर क्षेत्रापेक्षा संगीत आणि अध्यात्म या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व होते.परंतु गुरुकुल पद्धतीचा अट्टाहास मागे पडू लागला .गुरुकुल पद्धतीऐवजी इंग्रजी शिक्षणाला महत्व दिले जाऊ लागले. त्याची सावली संगीत क्षेत्रातही पडली . या काळात कौटुंबिक नाते नसतानाही केवळ कलेसंबधीच्या आसक्तीने संगीत शिक्षणाकडे पाहिले जाऊ लागले .या काळातील गुरु -शिष्या संबंधीचे गोड उदाहरण म्हणजेच पं.विषाणू नारायण भातखंडे आणि श्रीकृष्ण नारायण रातंजनकर हे होय. प.विष्णू नारायण भातखंडे : पंडित विष्णू भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० साली झाला . १८८० साली ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे जाऊन वकिली केली. १९१० पर्यंत वकिलाची नोकरी केली. प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी संगीताची विविध पारितोषिके जिंकली होती. त्यांना बासरी व सतार वादनाची आवड होती. त्यामुळे घरच्यांनीही भातखंडेना विरोध केला नाही . १८८४ लला भातखंडे मुंबईतील गायनोत्तेजक मंडळीचे सभासद झाले. त्या...