महाराष्ट्राची संगीत परंपरा
महाराष्ट्राचा संगीत इतिहास

महाराष्ट्राच्या इतिहासात देवगिरीच्या यादव वंशापासून संगीताला वारसा लाभलेला आहे कारण तेव्हा पासून दरबारात गाण्याची परंपरा चालू झालेली दिसून येते. पुढे जाऊन सिंघण राजाच्या दरबारात (१२१०-४७) सोढळ नावाचा काश्मिरी पंडित हा तेथील महसूल खात्याचा अमात्य म्हणून काम पाहत असे. तसेच तो एक संगीतज्ञ् होता . त्याच्या नंतर संगीतपंडित म्हणून प्रसिद्धीस आलेला शाङ्र्गदेव हा त्याचा मुलगा होय . पुढे शिवाजी राजांच्या कालखंडानंतर नानासाहेब पेशवेच्या दरबारात नारो अप्पाजी भावे हे प्रसिद्ध सतारवादक होऊन गेले . त्यांनी खुशालखा हे धृपदीये संगीत क्षेत्रात आणले होते. पेशवाईला उतरती कळा लागल्यानंतर पोवाडा व लावणी या गानप्रकाराना महाराष्ट्रात वाव मिळाला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत लावणी या गायन प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि प्रचार झाला. या प्रदेशाला सांस्कृतिक लोक वारसा लाभलेला असून त्यामध्ये भारुड, गोंधळ आणि तमाशात असणारी लावणी यांना त्यावेळी विशेष महत्व दिले जात होते. लावणी आणि पोवाडा या दोन संगीत प्रकारांनी महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. नृत्यावर प्रभुत्व हा लावणीचा महत्वाचा भाग होता.शाहिरी आणि पोवाडे हे देखील गायनाचे विशेष अंग होते. महाराष्ट्रातील शारंग देव हा एक 13 व्या शतकातील महान संगीतकार होता. नाट्य संगीत किंवा संगीत नाटकाला महाराष्ट्रातील जवळजवळ २०० वर्षीय परंपरा आहे.तसेच संगीत क्षेत्रात बाणगंगा महोत्सव , पुणे महोत्सव , औरंगाबाद मधील एलोरा महोत्सव , नांदेड येथील संगीत शंकर दरबार , सवाई गंधर्व महोत्सव असे विविध संगीत महोत्सव साजरे होतात .
पवार गोकुळ एकनाथ
पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग
के.टी एच.एम. महाविद्यालय , नाशिक
पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग
के.टी एच.एम. महाविद्यालय , नाशिक
Comments
Post a Comment