ए मेरे वतन लोगो ,,,,,,व्यर्थ न हॊ कुर्बानी

ए मेरे वतन  लोगो ,,,,,,


ए मेरे वतन के लोगो .. जरा याद करो कुर्बानी  असे म्हणणाऱ्या माझ्या प्रत्येक भारतीय नागरिक सध्या तरी  सुखा-समाधानाने जगत आहे . किंवा जगला पाहिजे या हेतूने रात्रीचा दिवस करून अहोरात्र देशाच्या सीमेवर लढणारे, माझ्या भारतीय बांधवांवर शत्रूने झाडलेली गोळी किंवा केलेला आघात आम्ही झेलण्यास तत्पर राहू आणि माझ्या देशावर हल्ला करणाऱ्यांचे हात
मुळापासून छाटू , शत्रूला नामोहरम करण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही या उद्देशाने राष्ट्रभक्तीने झपाटलेले वीर सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतात. आपण काय करतो ? परिस्थितीचा विचार न करता आपण फक्त काहीतरी मनाच्या वरून प्रतिक्रिया देत असतो.

आम्ही  *'हम सब भारतीय' है*चा नारा मोठ्या गर्वाने देतो. पण खरंच आजची परिस्थिती पाहता कोणालाच काही सोयरसुतक नाही. घटना झाल्यानंतर राज्य सरकारकडून शहिदांच्या घरच्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत. फक्त १५ लाख का ?  ज्या देशात खेळाडूंवर लाखो-कोटी रुपये उधळले जातात, ज्या देशातील बड्या मंदिरांमध्ये रोज लाखोंचा संपत्ती जमा होते , ज्या देशातील राजकारणी , अभिनेते , उद्योजक, क्रिकेटर लाखो करोडोंचे धनी आहेत, त्याच देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावून भारतमातेसाठी आपले जीवन ओवाळून टाकणाऱ्या शहिदांच्या घरच्यांना केवळ १५ लाख रु.? आणि ते ही आजच्या महागाईच्या डबडबलेल्या जगात ? आमच्या देशातील श्रीमंताच्या घरात जर केवळ *सत्यनारायणाची पूजा जरी घालायची म्हटली तरी आम्ही समारंभापासून ते पाहुण्यांच्या आदरातिथ्यापर्यंत हिशोब केला गरिबांच्या घरची आरामशीर ४-५ लग्न होतील . मग राज्य सरकारने शहिदांना दिलेला निधी घरच्यांना किती दिवस पुरेल हा विचार देखील सरकारने करणे गरजेचे आहे,

 हल्ल्यानंतर काही वेळातच काही बांधवानी ऑनलाइनच आसवं वाहिली. ज्यांच्यामुळे तुम्ही जागेवर राहून जगाशी हितगुज करता त्यांना सुद्धा तूम्ही अशाप्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे. कुणीतरी म्हटल आहे इतिहासातून धडा घेणं गरजेचं आहे नाहीतर इतिहास धडा शिकवल्या शिवाय राहत नाही , स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि जे आपल्या रक्षणासाठी आज बलिदान देत आहेत व  देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणाऱ्या प्रत्येक शहिदांचा मनापासून गौरव करणे गरजेचे आहे. अशा विरांचा त्याग लक्षात ठेवण्याची , जनमानसापर्यंत त्यांची किर्ती पोहचविण्याची , त्यांच्या परिवाराला एक मानसिक आधार आज नितांत गरज आहे . जेणेकरून इतर सैनिकांना थोडेफार का होईना आत्मबल  होण्यास मदत होईल. मग खऱ्या अर्थाने जरा याद करो कुर्बानी ऐवजी व्यर्थ न जावो कुर्बानी म्हणण्याची वेळ आली आहे...


पवार गोकुळ
के. टी. एच. एम. महाविद्यालय  

Comments

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य