महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत

महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत


महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे. या प्रदेशाला सांस्कृतिक लोक वारसा लाभलेला आहे . त्यामध्ये भारुड, गोंधळ आणि तमाशात असणारी लावणी यांना त्यावेळी विशेष महत्व दिले जात होते. लावणी  आणि पोवाडा या दोन संगीत प्रकारांनी  महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. नृत्यावर प्रभुत्व हा लावणीचा महत्वाचा भाग होता.शाहिरी आणि पोवाडे हे  देखील महत्वाचे अंग होते. महाराष्ट्रातील शारंग देव हा एक 13 व्या शतकातील महान संगीतकार होता. नाट्य संगीत किंवा संगीत नाटक महाराष्ट्रातील जवळजवळ 200 वर्षीय परंपरा आहे.तसेच संगीत क्षेत्रात बाणगंगा महोत्सव , पुणे महोत्सव , औरंगाबाद मधील एलोरा महोत्सव , नांदेड येथील संगीत शंकर दरबार , सवाई गंधर्व महोत्सव असे विविध संगीत महोत्सव साजरे होतात .

महराष्ट्रातील काही निवडक शास्त्रीय संगीतकार :

d v paluskar साठी प्रतिमा परिणामपंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर  (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५)
 हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचा जन्म मे १९२१ रोजी नाशिक मध्ये झाला . दहा वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले.बी पटवर्धन आणि पंडित जवाहरलाल,विनायकराव पटवर्धन, नारायण व्यास हि मंडळी तेव्हा पलुस्करांच्या वडिलांना ओळखत होती. पलुस्कर त्यांच्या वडील कडून संगीताचे बाळकडू घेत होते परंतु त्यांच्या निधनानंतर या थोर व्यक्ती कडून संगीताचे धडे गिरवले . म्हणजे त्यांच्या वडिलांनंतर हेच पलुस्करांचे गुरु होते. पलुस्कर १४ वर्षाचे असताना पंजाब मध्ये संगीत परिषद भरली होती.  संगीताचा वारसा लाभलेले ग्वालेर येथील गंधर्व महाविद्यालयातून पदार्पण करण्याची जबाबदारी पलुस्करांना प्रथम मिळाली. यानंतर त्यांची संगीत कारकिर्दीची सुरवात हि ग्वालेर घराण्यातच झाली. तसेच ग्वालेर घराण्यातूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आत्मसात केले. अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.त्यांचा मृत्यू मेंदूला आलेल्या सुजेमुळे २५ ऑक्टोबर १९५५ मुंबई येथे झाला . पलुस्करांना ३४ वर्षाचे आयुष्य लाभले परंतु या कमी वर्षात संगीत क्षेत्रात अनेक बदल घडवण्यात पलुस्करांचा वाट मोठा आहे.

चरित्रग्रंथ

पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुस्कर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे. त्यासाठी पलुस्करांनी लिहिलेल्या १२ वर्षांच्या रोजनिशीचा अभ्यास कीर्तने यांनी केला होता.



पवार गोकुळ एकनाथ
पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग
के.टी एच.एम. महाविद्यालय , नाशिक

Comments

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य