Posts

Showing posts from 2016

पं . विष्णू नारायण भातखंडे

Image
पं . विष्णू नारायण भातखंडे  एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात इंग्रजीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता . त्यावेळी सुद्धा गुरूला विशेष महत्व होते. इतर क्षेत्रापेक्षा संगीत आणि अध्यात्म या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व होते.परंतु गुरुकुल पद्धतीचा अट्टाहास मागे पडू लागला .गुरुकुल पद्धतीऐवजी इंग्रजी शिक्षणाला महत्व दिले जाऊ लागले. त्याची सावली संगीत क्षेत्रातही पडली . या काळात कौटुंबिक नाते नसतानाही केवळ कलेसंबधीच्या आसक्तीने संगीत शिक्षणाकडे पाहिले जाऊ लागले .या काळातील गुरु -शिष्या संबंधीचे गोड उदाहरण म्हणजेच पं.विषाणू नारायण भातखंडे आणि श्रीकृष्ण नारायण रातंजनकर हे होय.  प.विष्णू नारायण भातखंडे : पंडित विष्णू भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० साली झाला . १८८० साली ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे जाऊन वकिली केली. १९१० पर्यंत वकिलाची नोकरी केली. प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी संगीताची विविध पारितोषिके जिंकली होती. त्यांना बासरी व सतार वादनाची  आवड होती. त्यामुळे घरच्यांनीही भातखंडेना विरोध केला नाही . १८८४ लला भातखंडे मुंबईतील गायनोत्तेजक मंडळीचे सभासद झाले. त्या...

ए मेरे वतन लोगो ,,,,,,व्यर्थ न हॊ कुर्बानी

Image
ए मेरे वतन  लोगो ,,,,,, ए मेरे वतन के लोगो .. जरा याद करो कुर्बानी  असे म्हणणाऱ्या माझ्या प्रत्येक भारतीय नागरिक सध्या तरी  सुखा-समाधानाने जगत आहे . किंवा जगला पाहिजे या हेतूने रात्रीचा दिवस करून अहोरात्र देशाच्या सीमेवर लढणारे, माझ्या भारतीय बांधवांवर शत्रूने झाडलेली गोळी किंवा केलेला आघात आम्ही झेलण्यास तत्पर राहू आणि माझ्या देशावर हल्ला करणाऱ्यांचे हात मुळापासून छाटू , शत्रूला नामोहरम करण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही या उद्देशाने राष्ट्रभक्तीने झपाटलेले वीर सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतात. आपण काय करतो ? परिस्थितीचा विचार न करता आपण फक्त काहीतरी मनाच्या वरून प्रतिक्रिया देत असतो. आम्ही  *'हम सब भारतीय' है*चा नारा मोठ्या गर्वाने देतो. पण खरंच आजची परिस्थिती पाहता कोणालाच काही सोयरसुतक नाही. घटना झाल्यानंतर राज्य सरकारकडून शहिदांच्या घरच्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत. फक्त १५ लाख का ?  ज्या देशात खेळाडूंवर लाखो-कोटी रुपये उधळले जातात, ज्या देशातील बड्या मंदिरांमध्ये रोज लाखोंचा संपत्ती जमा होते , ज्या देशातील राजकारणी , अभिनेते , उद्योजक, क्र...

महाराष्ट्राची संगीत परंपरा

Image
महाराष्ट्राचा संगीत इतिहास महाराष्ट्राने हिंदुस्थानी संगीताची कला प्रथम उत्तर भागात जाऊन आत्मसात केली . त्याआधी सुमारे १००-१२५ वर्षांपूर्वी बाबा दीक्षित , बाळकृष्णबुवा इचल करंजीकर , वझेबुवा यांनी ग्वालेर येथील महाराजांच्या सेवेत राहून या कलेत पारंगत झाले . संगीताची वैभवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली. बाळकृष्णबुवांनी संगीत  मुहूर्तमेढ रोवली आहे. आग्रेवाले, जयपुरवाले ,किराणावले या सारख्या अन्य संगीत क्षेत्रातील महत्वपूर्ण घराण्यांनी संगीताची नांदी महाराष्ट्रातून सुरु केली.  त्यांनी सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात वास्तव्य करून महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी मानली. या सर्व गायकांनी आपल्या शिष्याकरवी महाराष्ट्रात संगीताचा प्रचार करण्यास सुरवात केली . हळूहळू संगीतशैली विकसित होऊन महाराष्ट्रात संगीत कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम घराण्यांनी केले .     महाराष्ट्राच्या इतिहासात देवगिरीच्या यादव वंशापासून संगीताला वारसा लाभलेला आहे कारण तेव्हा पासून दरबारात गाण्याची परंपरा चालू झालेली दिसून येते. पुढे जाऊन सिंघण राजाच्या दरबारात (१२१०-४७) सोढळ नावाचा काश्मिरी...

महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत

Image
महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे. या प्रदेशाला सांस्कृतिक लोक वारसा लाभलेला आहे . त्यामध्ये भारुड, गोंधळ आणि तमाशात असणारी लावणी यांना त्यावेळी विशेष महत्व दिले जात होते. लावणी  आणि पोवाडा या दोन संगीत प्रकारांनी  महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. नृत्यावर प्रभुत्व हा लावणीचा महत्वाचा भाग होता.शाहिरी आणि पोवाडे हे  देखील महत्वाचे अंग होते. महाराष्ट्रातील शारंग देव हा एक 13 व्या शतकातील महान संगीतकार होता. नाट्य संगीत किंवा संगीत नाटक महाराष्ट्रातील जवळजवळ 200 वर्षीय परंपरा आहे.तसेच संगीत क्षेत्रात बाणगंगा महोत्सव , पुणे महोत्सव , औरंगाबाद मधील एलोरा महोत्सव , नांदेड येथील संगीत शंकर दरबार , सवाई गंधर्व महोत्सव असे विविध संगीत महोत्सव साजरे होतात . महराष्ट्रातील काही निवडक शास्त्रीय संगीतकार : पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर  (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५)  हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह...

संगीतशैलीची परंपरा जतन करणारी कुटुंबे

Image
भारतीय संगीतातील घराणी आपल्या भारतीय संगीतात पूर्वी संगीत शिक्षण गुरुकुल पद्धतीने होत असे. एखाद्या श्रेष्ठ गायकाकडे संगीत शिकण्यासाठी राहणारी व्यक्ती त्या गायकाची मनोभावे सेवा करून,त्याच्या सानिध्यात चोवीस तास राहून संगीतकला अवगत करून घेत असे. पूर्वीच्या काही श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने आपल्या स्वतच्या गायकीची एक विशिष्ट शैली निर्माण केली व पुढे आपल्या शिष्याकरवी ती तशीच्या तशी जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संगीतशैलीची एक विशिष्ट कुटुंबेच संगीतक्षेत्रात वावरू लागली. त्यातून संगीतातील घराण्यांचा जन्म झाला. थोडक्यात असे म्हणता येईल की संगीतातील ही घराणी म्हणजे विविध संगीतशैलीची परंपरा जतन करणारी कुटुंबेच होय.  ग्वालेर घराणे : प्रख्यात संगीतकार खॉ नथन पीरबक्ष हे या घराण्याचे संस्थापक. त्यांचे नातू प्रख्यात ख्यालगायक हस्मु खॉ व हददू खॉ हे ग्वालेर दरबारचे गायक होते. महाराष्ट्रात ख्याल गायकी आणणारे कै. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे याच घराण्याचे. संगीताचा सर्व भारतभर प्रभावी प्रचार करणारे व विद्यालयीन पद्धतीच्या संगीतशिक्षणाचा...