संगीतसरताज किशोरीताई

किशोरी आमोणकर


किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी मुंबई येथे झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रमुख गायिका म्हणून आजही ओळखल्या जातात त्यानं आदराने गानसरस्वती म्हणून संबोधिले जाते. त्यांना सुरवातीपासूनच संगीताची गायन परंपरा आपल्या आईकडून मिळाली. त्याचप्रमाणे संगीताच्या इतर घराण्यांकडून त्यांना विशेष संगीताचे धडे मिळाले. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये पूर्ण केले. कालांतराने त्यांचा विवाह एका प्राध्यापकांशी झाला. परंतु लवकरच त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी संगीताचा ध्यास सोडला नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली.

किशोरी आमोणकरांनी १९५०च्या दरम्यान आपल्या संगीत व्यावसायिक कारकीर्दीस सुरवात  केली . त्यांनी पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' या गीतासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यानंतर १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरी आमोणकर या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना ते उत्कृष्टपणे सादर करतात. त्यांनी आपल्या संगीत शैलीवर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि आपल्या अंगभूत असणाऱ्या कौशल्यामुळे किशोरीताईंचे गाणे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. आपल्या संगीत कारकिर्दीत विविध ठिकाणी संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी विशेष निमंत्रणे असतात . त्यांनी संगीतावरील  'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा ग्रंथ लिहिला आहे.
 
 किशोरीताईंच्या लहानपणापासून त्यांना संगीत वारसा आपल्या आईच्या माध्यमातून लाभला होता.
त्याचप्रमाणे त्यांची मावशी केसरबाई केरकर यांनी सुद्धा त्यांना संगीताचे बाळकडू पाजले. किशोरीताईंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जयपूर घराण्याच्या संगीतातील तंत्र आणि बारकावे लक्षात घेऊन त्यामध्ये नवीन शैली तसेच कल्पकता यांचा समावेश त्यांनी केला. प्राचीन काळातील संगीतावरील ग्रंथ , त्याची व्यापकता यावर संशोधन झाले आहे. त्याच धर्तीवर पट बिहाग, ठुमरी , अहिर भैरव , राग यासारखे संगीत रचनांचा अंतर्भाव त्यांनी आपली शैलीत केला. एकदा योगराज सिद्धनाथ यांनी सारेगमपा या अल्बम द्वारे किशोरीताई विषयी बोलत होते. अल्बम तयार करताना शब्द आणि सूर यांचा विलक्षण संगम किशोरीताईंच्या आवाजात पाहावयास मिळाला. त्यांच्या आवाजातून एक प्रकारे भाषेचा उगम होत आहे असे वाटायचे. एकंदरीत हा कुठल्याही प्रकारचा मूकचित्रपट नाही असते म्हणाले होते. संगीत या शब्दात अफाट शक्ती आहे, ते तुम्हाला योग्य मार्गाने निश्चितस्थळी घेऊन जाते.  
किशोरीताईंनी आपल्या संगीत व्यावसायिक जीवनात संगीताला विशेष महत्व दिले आहे . त्यापैकी काही अल्बम तयार केली आहे. 'अरुणोदय' , 'समर्पण' ,'जन्म गाणे' यासारखे  अल्बम तयार केले आहे.  किशोरीताई या प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांना संगीत क्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल आयटीसी संगीत पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्यांना १९८७ मध्ये पद्मभूषण, २००२ पद्मविभूषण , १९८५ संगीत नाटक अकादमी पुरस्कार , तसेच २००९ संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.
एकंदरीत किशोरीताई ह्या संगीतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून आज ओळखल्या जातात. त्यांनी आजवर संगीताला विशेष योगदान दिलेलं आहे. त्यामुळे भारतीय तसेच महाराष्ट्राला संगीतातील एक अमूल्य देणं म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य