भारतीय संगीत
भारतीय संगीताची परंपरा
ऐतिहासिक काळापासून भारतात समृद्ध संगीताची परंपरा
आहे. काही कमी प्रमाणात संगीताची इतकी वैभवशाली परंपरा आहे. असे मानले जाते की ,
भारतीय संगीताची परंपरा ही सिंधु घाटी या संस्कृती पासून सुरू होते. भारतातील दोन
महाकाव्ये रामायण-महाभारत यांच्या रचनेमध्ये संगीताचा प्रभाव दिसून येतो. भारतात
सांकृतिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत येता येता संगीतशैली व पद्धती मध्ये
मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आले. भारतीय इतिहासातील महान संगीतकार त्यापैकी
कालिदास, तानसेन अमीर खुसरो आदींनी भारतीय
संगीताच्या प्रगतीला महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
भारतीय संगीतातील प्रेरक म्हणून शिव आणि सरस्वती ला मानले जाते. याच तात्पर्य हेच की कोणताही मानव दैवी प्रेरणेशिवाय कोणतीही क्ल अवगत करू शकत नाही. चौदाव्या आणि पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय संगीतावर मुस्लिम धर्माच्या “इराणी संगीताचा” पगडा होता. सुल्तान अल्लौदिन (ई.1295-1316) च्या दरबारात अमीर खुसरो हे मोठे ज्ञानी होते. त्यांनी “कव्वाली “ या संगीत प्रकारचा प्रसार केला . असा उल्लेख आढळून येतो की, सितार वाद्याची निर्मिती देखील या संगीतकाराणे केली. तबला, ख्याल या सारख्या वाद्य व रागाचा निर्माण यांनी केले . काही कालांतराने बहादुर मालिक यांनी संगीत ग्रंथाना एकत्र करून “संगीतशिरोमणी” नावाचा संगीत विषयक ग्रंथ तयार केला. अठराव्या शतकात श्रीनिवास यांनी “रागतत्वविबोध” नावाचा संगीत विषयक ग्रंथ लिहला .सतराव्या आणि अठराव्या शतकाच्या मध्यंतरामध्ये “भावभट्ट” यांनी अनुपविलास , अनुपसंगीत रत्नाकर , अनुपांकूश या सारख्या संगीत ग्रंथाची रचना केली. 1823 मध्ये पटना येथील मुहम्मद रजा यांनी “ नागमते असफी’ या गरांठा मध्ये वर्णन करताना रागाचे वर्गीकरण केलेले आहे . अठराव्या शतकात एक प्रकारे प्रत्येक घराणे हे संगीत शिक्षणाचे औपचारिक केंद्र म्हणून प्रस्थापित होते. परंतु त्यानंतर ब्रिटिश शासन काळात ही घराणी लोप पावत गेली. कारण पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय संगीतावर पडत होता.
तसेच संगीत या कलेला प्रतिसाद देखील मिळत गेला. परिणामी रसिक श्रोते वाढत गेले. त्यामुळे भारतीय संगीताला आज वैभव प्राप्त झालेले दिसून येते .
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम.कॉलेज
Comments
Post a Comment