कॉलेजचे दिवस भाग ३
पत्रकारितेची दोन वर्षे अन बरच काही ...
बीए च शेवटच वर्षे पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. परंतु पुढे काय ? या विचारात होतो. हॉटेलचा जॉबही सोडला होता, त्यामुळे तिथे परत जाण चुकीच वाटतं होत.. काही दिवसांनी हॉटेलमधील सरांचा फोन आला.. मला तातडीने बोलवलं होत... कुणी सर आले होते हॉटेलला त्यांना भेटायला... कुठेतरी जॉब असेल या हेतुने मी लागलीच ञ्यंबकला गेलो.. ते सर म्हणजे औरंगाबाद विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत खिल्लारे होते... त्यांनी मला जॉब ऐवजी एमए मास मिडिया बद्दल सांगितले... मला तर मास मिडिया काय आहे हे माहीतही नव्हते.

फेस्टिव्हल असताना भाग घ्यायचो..इतरही स्पर्धांत सहभागी व्हायचो. परंतु ज्या द्वीअर्थाने केटी ला प्रवेश घेतला होता त्या नाटकासाठी काही भाग घेता आला नाही... ( हि फार मोठी खंत आहे माझ्यासाठी, माझ नाटक इथुन माग पडलं खर तर) असो...
या दोन वर्षात खूप चांगले मित्र मिळाले. प्रत्येकजण आज आपापल्या कामात माहीर आहे. पलटण विषयी काय बोलायचं.. प्रत्येकात वेगळेपण होत.. वैभव ( दाद्या) खरच नावाप्रमाणेच मनानेही अन् मैञीचही वैभव आहे तो.. (हसु नको खर बोलतोय) हुशार, तितकाच सडेतोड... त्याचाच मिञ विजयही.. हा माणूस म्हणजे.. कस काय जमत तुला.. विकासभाऊ बस enjoy... तुझ्या सारख अजुनही जगता येत नाहीय मला... यशवंतराव... माझा बीए चा मित्र...मेहनती..सागर जगताप ... मनमाड पाणीप्रश्न .. याच्या लग्नाला खुप धमाल केली होती.. अभिजीत... भारी माणुस... मोठेपणाचा कुठलाच आव नाही...अमोल..... माझा एकदम खास मिञ.. शबदसंचयवाला...अझहर ... Oppo A 57.. सर तुमच्यामुळे आज पत्रकारितेत खूप काही करावेसे वाटते ... आणि यासारखेच अनेक मित्र मला पत्रकारितेतून मिळाले.
अरे महत्वाच या दरम्यान एक महत्त्वाची माझ्या आयुष्यात आली.. मागील ब्लॉग मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही केटी ला युवा स्पंदन साठी आलो होतो त्यावेळी माझ्या भुमिकेला भरभरून दाद देणारी व्यक्ती म्हणजेच किरण होय. केटी ला असताना भेटी होत गेल्या.. नंतर होस्टेलाही सोबत होतो... अजुनही मैञीच किरण बनुन माझ्या आयुष्यात आहे.
आजही ही पलटण मैञीच्या धाग्यात गुंफलेली आहे. काही कामानिमित्त फोन होत असतात. प्रत्येकजण आपापल्या विश्वात आहे..त्यांच जग फिरुन झाल्यावर भेट होईलच....या दोन वर्षांत काही गोष्टी शंका स्वरुपात होत्या त्यांचा प्रत्ययही इथ आला.. सगळ्याच गोष्टी मनापासून केल्या. आज त्या गोष्टीच चीज झाल्याच समाधान आहे. नकळत काही ठिकाणी भावनिक झालो.. निष्ठुर होण्याचाही प्रयत्न केला. परिणामी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. आपण जसे असु तस जग असेलच अस नाही... क्रमश :
पुढील ब्लॉगमध्ये पत्रकारितेचे दीड वर्षे ज्या वसतिगृहात राहिलो त्या आठवणी असणार आहे.
Mast lihilay pn photos Mazyakde magitle aste tr ajun Chan photos dile aste mi
ReplyDeleteTari Pan ek gosht nakkich Avadli mala
ReplyDeleteTuzi Lekhanshaili khupch sundar zaliye yaar pahilyapeksha
Mi tuzya ya lekhanshailicha ani blogcha Nehami Vachak asnar ahe yaat shanka Nasavi
thanku bhava
Deletetumchyamule lihnyachi prearana mialali baki kay ?
I will waiting for the next blog
ReplyDeleteखरचं भाऊ हे दिवसच आपल्यासाठी वेगळे असतात.
ReplyDeleteAre ek imp vyakti rahili ki.....
ReplyDeleteवैभव... आपल्यासाठी जे थांबले त्यांच्यासाठी आपण सदैव तत्पर असतो...
ReplyDeleteमित्रा, खूप चांगल्या पद्धतीने तू अनुभव कमी शब्दांत पण दमदार पणे मांडले. खरंच खूप प्रतिभा ठासून भरली आहे तुझ्यात, याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तू असाच लिहीत रहा, कधी लेखक बनून तर कधी कवी मनाचा वेध घेत कविता रचत जा...तर कधी चांगला सुमधूर पण हृदयाच्या ठाव घेणारा आवाज कंठातून येऊ दे गात रहा, छान अभिनय या जीवनात रंगमंचावर कर, अन उततोरोत्तर प्रगती कर, यशोशिखरावर पोहच याच एका मित्राच्या तुला सद्दीच्छा, आणि एक अपेक्षा, तुझ्या शब्दांत मला पुढे मंत्रालय अभ्यास दौरा वाचायला जरूर आवडेल
Deletenakkich sir
Deletedaday kadak re pani aal rw dolyat kadhi tri bheuya aapn srw.........
ReplyDeleteho nakki
Delete