आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..!

 आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..!



आज सकाळी मित्राचा कॉल आला, अरे मला खूपच भारी झालंय, लवकर ये...दोन तीन दिवसापासून आजारी असल्याने त्याला उठताही येत नव्हते. मग लागलीच त्याच्या घरी गेलो.

झोपलेलाच होता, म्हटला, निघायचं का? आधी थोडस खाऊन घे, लगेच निगु...! गाडीला किक मारली अन निघालो...! पाच दहा मिनिटात दवाखान्यात पोहचलो. साडे दहाची वेळ असल्याने अद्याप कुणी पेशंट नव्हतं, त्यामुळं याला लगेचच इंजेक्शन आणि सलाईन लावलं. 

आमच्यानंतर एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन आत आली. ते मुलं अधून मधून खोकत होतं. त्याला डॉक्टरांनी तपासून वाफ देण्यास सांगितली. सिस्टरने लागलीच त्याला वाफ देत डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे गोळ्या औषधें दिली. बिल झालं होतं दोनशे रुपये ...

त्या महिलेने विनवणी करीत डॉक्टरांना पैशासाठी थांबायला सांगितलं..त्या लहान बाळाला चार दिवसांचा कोर्स होता. आजचा तिसरा दिवस होता. त्याच्या आईच्या बोलण्यावरून त्याच्यात फरकही पडला होता. परंतु आजही त्या महिलेकडे देण्यास पैसे नव्हते. गहिवरून आलं. डॉक्टरांनी सांगितलं, एकवेळ तुमच्या पोटाला मारा पण लहान पोरांकड लक्ष देत चला, तुमच्याकड पैसे आले की द्या... 


डॉक्टरांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की त्या महिलेचे चार दिवसांच्या कोर्सचे पाचशे - साडे पाचशे रुपये झाले होते. परंतु महिलेने डॉक्टरांना शंभर रुपये दिले होते. उद्याही तिला यायचं होत. पण आजच्या दिवसाच्या बिलाचेही तिच्याकडे पैसे नव्हते.

अहो साहेब, आमच्या ह्यांना काम नाही, एक दोन महिन्यांपासून पासून घरीच आहेत, त्यामुळं थोडं एक दोन थांबा, मी देईन पैसे...

आम्ही दोघ बाजूलाच बसलो होतो, काय करणार..****  सगळं सोंग घेता येत पण पैशाच सोंग घेता येत नाही...साला एकीकडे दोनशे रुपये एका तासात उधळले जातात, पण इथं स्वतःच्या पोराच्या दवाखान्याचे बिल द्यायला दोनशे रुपये नाहीयेत. केविलवाणी गोष्टय...खरच आयुष्यात पैसा खूप महत्वाचाय... काहीही करा, पण पैसा मिळवण्याच साधन बघा..तुमची आई-वडील जेव्हा दुसऱ्याचे उंबरे झिजवता ना, तेव्हाच तुम्ही हरलेले असता..


 #आयुष्य 

२४ ऑगस्ट २०२१ ११: २९

Comments

  1. खर आहे.
    पैसा सर्व काही नसला तरी, बरच काही आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य