स्वर


 स्वरांची रचना  
शहरात किंवा गावात एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही उभे असाल तर विविध वाहनांचे आवाज , माणसांची बडबड , फेरीवाल्यांचे ओरडणे , दुकानांमधील असंख्य आवाज या सार्‍यांनी बनलेला गोंगाट आपल्याला ऐकू येतो . गोंगाटाचा विशेष गुणधर्म म्हणजे आवाजांमध्ये असलेली अनियमितता आणि असबंधपणा होय.Image result for indian musical instruments with names and pictures
समुद्राच्या काठी भरतीच्या वेळेस शांत ठिकाणी तुम्ही उभे असाल तर किनार्‍यावर येऊन धडकणार्‍या लाटांचा आवाज तुमच्या कानावर येतो. या समुद्राच्या गाजेमध्ये एक नियमितता आलेली दिसते. आवाजामधला नियमितपणा हा ध्वनी ते स्वर या प्रवासातला पहिला महत्वाचा घटक आहे. आपल्या गावापासुन दूर एखाद्या जंगलात तुम्ही फेरफटका मारत असाल तर पक्ष्यांची किलबिल ,भुंग्याचा गुंजारव तुम्हाला ऐकू येईल . या आवाजामध्ये नियमिततेबरोबरच सुखदपणा किंवा कानाला गोड वाटण्याची क्षमता दिसते . हा सुखदपणा ध्वनीला स्वराकडे नेणारा दूसरा महत्वाचा घटक आहे.

भुंग्याच्या आवाजाची एक विशेषता म्हणजे तो आवाज एकाच पातळीचा,एकसारखा आहे असे आपल्याला जाणवते , म्हणजेच त्या आवाजाची कंपनसंख्या ही साधारणपणे एकाच असते . देवाच्या दर्शनाला देवळात गेल्यावर भक्तलोक घंटा वाजवतात . त्याला आपण ‘घंटानाद’ नियमित आणि सुखद तसेच एका कंपनसंख्येचा असलेला हा ध्वनी मानवनिर्मित आहे. आपल्या व्याख्येनुसार मानवाने येथे सुंदर ध्वनीची निर्मिती केलेली दिसून येते. सगळ्यात शेवटी जेव्हा एखादा गायक आपले गाणे सुरू करतो , तेव्हा तो नियमित , सुखद, एकाच कंपनसंख्येचा असा आवाज निर्माण करतो त्याला “स्वर” असे म्हणतात .थोडक्यात, सांगीतिक निर्मितीच्या हेतूने वापरला गेलेला नियमित, सुखद आणि मानवनिर्मित असा ध्वनी म्हणजे आपल्या संगीतातील “स्वर“ होय.



स्वर सप्तक: 
Image result for indian musical instruments with names and picturesसांगीतिक रचना करायची  असेल तर एक स्वर असून पुरणार नाही आपल्या संगीतात असे एकूण ७ स्वर आहेत. सप्तकातील पहिला  स्वर म्हणजे सा किंवा षडज . याला आधारस्वर असे म्हणतात निश्चित केल्यावरच सप्तकातील अन्य स्वरांच्या जागा निश्चित करता येतात. या स्वरांच्या जागा किंवा स्वर स्थाने ही आधारस्वर ‘सा” शी विशिष्ट गुणोत्तराच्या स्वरांतराने निश्चित होतात. या स्वर स्थांनाच्या निश्चितीमागे तत्व हे संवादतत्व आहे. या संवादाच्या आधाराने म्हणजेच कानाला सुखदपणा देणार्‍या स्वरांतराच्या सहाय्याने सप्तकामध्ये सात स्वर आलेले दिसतात .

सा – षडज , रे – रिषभ , ग – गांधार , म – मध्यम , प – पंचम , ध – धैवत , नि – निषाद
निषादानंतर येतो त्याला सा म्हणतात . येथून पुढचे सप्तक सुरू होते . सा ते तार सां यांच्यामध्ये दुपतीचे अंतर असते .म्हणजे सा जर २८० कंपनसंख्येचा असेल तर तार सां हा ५६० कंपनसंख्येचा त्याचप्रमाणे सा आणि प यांच्यामध्ये ३/२ किंवा दिडपटीचे स्वरांतर असते . म आणि तार सां यांच्यामध्ये हेच दिडपटीचे स्वरांतर दिसते . सप्तकातील अन्य स्वर रे- ध -,ग – नि याही स्वर जोड्यांमध्ये हेच दिडपटीचे स्वरांतर दिसते . या दिडपटीच्या स्वरांतराला “ षडज – पंचम ‘ भाव असे म्हणतात . सप्तकातील या सात स्वरांना ‘शुद्ध स्वर ‘ म्हणतात . सा आणि शुद्ध रे यांच्या मधल्या जागेतला आणखी एक स्वर वापरतात त्याला ‘कोमल रे” असे म्हणतात . त्याचप्रमाणे रे आणि ग च्या मध्ये असलेल्या स्वराला ‘ कोमल ग “ असे म्हणतात . म आणि प यांच्यामध्ये असलेल्या स्वराला “तीव्र म” प आणि ध यांच्यामध्ये असलेल्या स्वराला “कोमल ध “ असे म्हणतात . व ध आणि नि यांच्यामध्ये असलेल्या स्वराला “कोमल नि “  अशाप्रकारे सप्तकामध्ये ७ शुद्ध स्वर आणि ५ विकृत स्वर असे मिळून १२ स्वर रचनानिर्मितीसाठी आपल्याला उपलब्ध असतात.


Image result for indian musical instruments with names and picturesकोमल स्वर म्हणजे शुद्ध स्वरांची कंपनसंख्या कमी करणे . म्हणजेच शुद्ध रे ची कंपनसंख्या कमी केली असतं कोमल रे ऐकू येतो. मात्र कोमल स्वरांच्या जागा ह्या शुद्ध स्वरांच्या जागांप्रमाणे नेमकेपणाने निश्चित केलेल्या दिसतात . त्या प्रत्येक रागाप्रमाणे बदलू शकतात .भारतात असे म्हटले जाते की, हे सात स्वर क्रमाने : मोर,गाय, बकरी, कावळा , कोकिळ , घोडा , आणि हत्ती या स्वरातून घेतलेले आहेत. म्हणजेच हे सर्व प्राणी क्रमाने याच स्वरात बोलतात . आणि यांच्या अनुकरनातून स्वरांची संख्या निश्चित केली आहे. वेगवेगळ्या स्वरांच्या उच्चारांचे स्थान वेगवेगळे संगितले आहेत . उदा. नाक, गळा. उर, टाळू , जीभ आणि, दांत या सहा स्थांनामध्ये निघण्याचे कारण पहिलं स्वर ‘षडज” म्हणून ओळखला जातो. 

पवार गोकुळ एकनाथ  

के.टि.एच.एम महाविद्यालय

Comments

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य