संगीत
(New Media)विषयासाठीचा हा पहिला ब्लॉग
सदर करीत आहे.
संगीतकला
संगीताची वर्ल्ड्बूक डिक्शनरी ने केलेली
व्याख्या : द आर्ट ऑफ मेकिंग साउंड दट आर बिउटीफुल,एन्ड पुटिंग देन टुगेदर इनटू
बिउटीफुल प्लेसिंग ऑर इंटरेस्टिंग अर्रेंगमेन्ट. या व्याखेतील प्रत्येक शब्द
महत्वाचा आहे. संगीत हि एक कला आहे . यामध्ये सुंदर ध्वनी निर्माण करून त्या
ध्वनीच्या कानाला सुखद अशा सुंदर आणि बुद्धीला आंनद देणाऱ्या रचना केल्या जातात .
जाणीव पूर्वक आणि संगीत निर्मितीच्या हेतूने ध्वनी निर्माण करायचे हे संगीत कलेत
प्रामुख्याने केले जाणारे काम आहे.प्रत्येकाला संगीत म्हणजे काय याचे उत्तर शब्दात
नाही, तरी ‘ऐकून ‘ माहित असते. आपण कुठल्या गोष्टीला संगीत म्हणतो , याचा विचार
केला आपल्या डोळ्यासमोर असंख्य गाण्यांची यादी उभी राहील. ढोबळमानाने पाश्चात्य
संगीत आणि भारतीय संगीत असे म्हटले कि, विविध वाहिन्यावरून वाद्यांच्या दणदनाट आणि
अगम्य भाषेमुळे ‘आपले’ न या वाटणारे , परंतु मोठ्या शहरामधल्या असंख्य तरुण-तरुणींना
बेभान होऊन नाचायला लावणारे असे संगीत डोळ्यापुढे येते भारताच्या विविध प्रदेशामध्ये
अतिशय समृद्ध अशी लोकसंगीताची परंपरा आहे. शहरात किंवा गावात एखाद्या गर्दीच्या
चौकात जर तुम्ही उभे राहिलात तर विविध वाहनांचे आवाज , माणसांची बडबड ,
फेरीवाल्यांचे ओरडणे , विविध दुकानामधील असंख्य आवाज या साऱ्यानी बनलेला गोंगाट
आपल्याला ऐकू येतो .समुद्राच्या काठी भरतीच्या वेळेस शांत ठिकाणी तुम्ही उभे असाल
तर किनार्यावर येऊन धडकणाऱ्या लाटांचा आवाज तुमच्या कानावर येतो. या समुद्राच्या
गाजेमध्ये एक नियमितता आलेली दिसते .
तर संगीत हि एक मनाला वेड लावणारी कला आहे. ज्यामध्ये आपण तल्लीन होऊन ते संगीत ऐकत असतो .
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम महाविद्यालय
के.टी.एच.एम महाविद्यालय
its a thing which a incredicable to us and a new........
ReplyDelete